Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

लक्षतीर्थ वसाहत येथील प्रबुद्ध भारत हायस्कूल येथे भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने 'सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन' भेट देण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. Arundhati Dhananjay Mahadik यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थिनींशी संवाद साधला.

वयात येत असताना मुलींना काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात परंतु या समस्यांकडे मुली दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता मुलींनी आरोग्याविषयी आपल्या पालकांशी मनमोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. अशा समस्याविषयी समाजात जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन नेहमी प्रयत्नशील राहील, असे मत सौ. महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी मा. एस. एस.अर्दाळकर, मा. शन्मुखा अर्दाळकर, मा. बी एस. शिंपुकडे, मा. राहुल पाटील, मा. शिवानी पाटील, मा. एस. सी. पाटील, यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.