2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003
भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स यांच्या वतीने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांना राखी बांधली. तसेच भागीरथी महिला संस्थेमार्फत ग्रंथालयात पुस्तके भेट देण्यात आली.
समाजामध्ये जीवन जगत असताना ज्यांच्या हातून कळत नकळत काही गुन्हा घडला आहे, असे बंदी न्यायव्यवस्थेने दिलेली शिक्षा कारागृहात भोगत असतात. घरापासून व समाजापासून गेले कित्येक वर्षे दूर असलेल्या बंदींना राखी बांधण्याचा मानवतावादी दृष्टिकोन भागीरथी महिला संस्थेच्या भगिनींनी जपला आहे.