Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

भागीरथी महिला संस्था आणि गार्डन क्लब यांच्या वतीने फुलांपासून रंगपंचमीचे कलर बनवण्याचे मोफत प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. नैसर्गिक पद्धतीने आपण रंग कसे बनवू आणि घरच्या घरी ते आपल्याला सोप्या रीतीने कसे बनवता येतील, जेणेकरून तरुण पिढी व लहान मुलांना कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही. याकरिता पल्लवी कुलकर्णी, संगीता सावर्डेकर यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.
महिलांकडे उत्तम व्यवस्थापन आणि टीमवर्क ही कौशल्ये जन्मतःच असतात, त्याला भागीरथी महिला संस्थेच्या प्रशिक्षणाची जोड मिळाली की महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण होतात. असे मत सौ. अरुंधती महाडिक यांनी यावेळी मांडले. यावेळी गार्डन क्लबच्या अध्यक्षा मा. पल्लवी कुलकर्णी, मा. संगीता सावर्डेकर, मा. अश्विनी वास्कर तसेच भागीरथी महिला संस्थेचे सभासद उपस्थित होते. *खासदार धनंजय महाडिक*