Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

आषाढी एकादशी निमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन फिनिक्स यांच्या वतीने 'रोटरी वारी' आयोजित केली होती. नंदवाळ येथे जाणाऱ्या या दिंडीमध्ये अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक* यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. याठिकाणी भारतीय जनता पार्टी, धनंजय महाडिक युवा शक्ति, भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन फिनिक्स यांच्या वतीने वारकरी बंधूंना फराळ वाटप केले. तसेच दिंडी मार्गावर असलेल्या स्टॉलला सौ. महाडिक यांनी भेटी दिल्या.


पंढरीची वारी' म्हणजे महाराष्ट्र धर्माचं प्रतीक आहे. जात, पात, धर्म, पंथ, भाषा, रंग, गरीब- श्रीमंत हे सर्व भेद विसरून प्रत्येकजण एकरूप होऊन भक्तीरसात न्हाऊन जातो. वारकरी संप्रदायाची एक उत्तम संस्कृती आजच्या दिवशी पहावयास मिळते. यावेळी मा. बी. एस. शिंपुकडे, मा. अनिरुद्ध तगारे, मा. सायली तगारे, मा. शरद पाटील, मा. रमेश खटावकर, मा. सचिन लाड, मा. आकेत शहा, मा. भारती नायक, मा. ऋषिकेश जाधव, मा. अनुष्का शिंदे, मा. निखिल कोळी, मा. श्री. पटेल, मा. विजय खांडेकरी यांच्यासह रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन फिनिक्सचे सदस्य उपस्थित होते. *खासदार धनंजय महाडिक*