2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003
महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलेचा जागर! भागीरथी महिला संस्था आयोजित भव्य 'झिम्मा फुगडी स्पर्धा 2024' कार्यक्रम मोठ्या उत्साहात व निखळ आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री उपस्थित होते. महिला-भगिनींनी सादर केलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ सिनेअभिनेते मा. सचिन पिळगांवकर व अभिनेत्री सौ. सुप्रिया पिळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.भागीरथी महिला संस्थेने आयोजित केलेल्या या पारंपारिक लोककला स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मुलींपासून ते अगदी वयोवृद्ध आजींपर्यंत प्रत्येक वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचवणे, काटवट काणा, छुई-फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडाघोडा हे पारंपारिक खेळ खेळत महिलांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. तसेच स्पर्धेतील विजयी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी सौ. वैष्णवी महाडिक यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट कल्चरच्या वतीने महिलांसाठी लेझीम, दांडपट्टा व स्वसंरक्षणाचे धडे देणारे प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. या संकल्प पत्रिकेचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भागीरथी महिला संस्था नेहमीच विविध सामाजिक उपक्रम हाती घेत असते. यावेळीही आपली संस्कृती परंपरा जपत आयोजित केलेली झिम्मा-फुगडी स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो महिलांसाठी नवी ऊर्जा देणारी होती. यावेळी सौ. अरुंधती महाडिक, मा. पृथ्वीराज महाडिक, मा. विश्वराज महाडिक, मा. कृष्णराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, सौ. मंजिरी महाडिक उपस्थित होते.