Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचे गाव गिरगांव अशी ओळख असलेल्या गावात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन फिनिक्सच्या* वतीने गावातील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्यासह सर्व पदाधिकारी व आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आजी-माजी सैनिक आणि वीर माता-भगिनींचा सत्कारही करण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानातून आज हा भारत देश उभा आहे. देशाच्या सीमेवर रात्रंदिवस सेवा करणाऱ्या सैनिकांचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून सैन्य दलामध्ये भरती होण्याची परंपरा खूप मोठी आहे. त्यामध्ये सैनिक टाकळी व सैनिकांचे गाव गिरगांव ही दोन नावे महाराष्ट्राच्या नकाशावर आहेत. याचा आपल्या कोल्हापूरकरांना नेहमीच अभिमान आहे. *गिरगांव मध्ये एकूण 386 आजी-माजी सैनिकांची कुटुंबे आहेत. त्यामधील 84 जवान सध्या देशसेवा करत आहेत.* या सैनिक कुटुंबांच्या सेवेसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाडिक कुटुंब कायमच तत्पर राहील, असा विश्वास यावेळी सौ. अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी मा. रघुनाथ पाटील, मा. निवृत्ती पवार, मा. शशिकांत साळोखे, मा. बळवंत शिंदे, मा. नासिर बोरसादवाला, मा. बी. एम. शिंपुकडे, मा. कमांडर राजाराम शिंदे, मा. अमोल देशपांडे, मा. संपत पाटील, मा. रमेश खटावकर, मा. राजशेखर संबरगी, मा. भारती नायक, मा. प्रतिमा शिंपुकडे, मा. विकास राऊत, मा. योगेश आडसूळे, मा. विजयालक्ष्मी संबरगी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. *खासदार धनंजय महाडिक*