2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी भागीरथी नागरी पतसंस्थेचे अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांची रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेची उत्कृष्ट वाटचाल सुरु केल्याबद्दल अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला. याला सर्वानुमते सहमती घेऊन सौ. वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सौ. अरुंधती महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.