Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन व धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कोल्हापूर हायस्कूल येथे आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. Arundhati Dhananjay Mahadik यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. सुहास प्रभावळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

भारतीय सण उत्सवाला वैज्ञानिक आधार आहे. दिवाळी सणाच्या अनुषंगाने आकाशकंदील बनवणे हा वेगळाच आनंद आहे. यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. गेल्या काही वर्षापासून पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाढत आहे परंतु भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. ही संस्कृती आपण सर्वांनी जपूया व तिचा सन्मान करूया, असे मत यावेळी सौ. महाडिक यांनी व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापक मा. व्ही. डी. हिरेमठ, मा. एस. एल. गडकरी, मा. सागर बगाडे सर, मा. बी. एस. शिंपुकडे, मा. सुहास प्रभावळे, मा. रंगराव जोदाळ, मा. प्रिती मुरगुडे, पूजा हुद्दार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.